केज येथे भव्य त्रिदिवसीय समर्पण कीर्तन महोत्सव संपन्न.

केज/प्रतिनिधी
श्री ज्ञानेश्वरी जयंती व पितृपक्षाचे औचित्य साधून श्रीराम मंदिर, केज येथे भव्य कीर्तन महोत्सव संपन्न झाला. उत्सवाचा प्रारंभ दिनांक 13 सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वरी जयंती निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरीग्रंथाची पालखीमध्ये मिरवणूक काढून झाला.
दि.13 सप्टेंबर रोजी ह.भ.प. श्री.संतोष महाराज बिडगर यांची कीर्तन सेवा व नंतर दीपोत्सव संपन्न झाला दिनांक 14 सप्टेंबर रोजी ह.भ.प. श्री.बापू महाराज दातार व दि.15 सप्टेंबर रोजी पुणे येथील सौ. तेजस्विनी कुलकर्णी धानोरकर यांची नारदीय यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.पुणे येथील प्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित गंगाधर देव व तबलावादक श्री. बाळासाहेब अलास्कर यांची साथ-संगत लाभली.
महाप्रसादाने या कीर्तन महोत्सवाची सांगता झाली.केज शहरातील व परिसरा तील असंख्य श्रोत्यांनी या कीर्तन महोत्सवाला हजेरी लावली होती या भव्य कीर्तन महोत्सवाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल संयोजक ह.भ.प.श्री.भालचंद्र महाराज देव व सचिनराव देशपांडे यांनी सर्व भाविकांचे आभार मानले आहेत.



