क्रिडासामाजिक

केज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर पंचायत आमच्या ताब्यात द्या;अक्षय भैय्या मुंदडा यांची केजकरांना भावनिक साद महाराष्ट्र दिन आणि वाढदिवसानिमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

केज/प्रतिनिधी

केज शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी यावेळेस केज नगर पंचायत आमच्या ताब्यात द्या,असे भावनिक आवाहन युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांनी केजकरांना केले. महाराष्ट्र दिन आणि अक्षय भैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केज शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

खेळाडूंना प्रोत्साहन आणि विकासाचा संकल्प

मैदानात खेळाडूंचा उत्साह वाढवताना अक्षय भैय्या यांनी केज शहराच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले.ते म्हणाले की,शहराच्या मूलभूत सुविधांपासून ते सुशोभीकरणापर्यंत अनेक कामे मार्गी लावण्यासाठी सत्ता परिवर्तनाची गरज आहे. तरुणांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणतानाच,शहराच्या विकासासाठी त्यांनी जनतेकडे खंबीर पाठिंब्याची मागणी केली.

मान्यवरांची मांदियाळी

या उद्घाटन सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये प्रामुख्याने पोलिस उप अधीक्षक वेंकटरामन,रणजीत सिंह पाटील,पशुपतिनाथ दांगट पाटील,डॉ.वासुदेव नेहरकर,कबीर भाई इनामदार,भाई मोहन गुंड,हनुमंत भोसले सर,सुनील घोळवे,खद्दिर कुरेशी यांच्यासह झिशान कादरी,विनोद गुंड, प्रकाश मुंडे,राहुल भैय्या गदळे,सुरज घुले,संतोष जाधव, अकबर इनामदार, इत्तेशाम कादरी,गणेश कुलकर्णी,डॉ. विजयकुमार मोराळे, आमेर इनामदार आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे स्वरूप

अक्षय भैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेत अनेक नामांकित संघांनी सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खेळाडूंमध्ये क्रीडा संस्कृती जोपासली जावी आणि तरुणांनाव्यासपीठ मिळावे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.या कार्यक्रमाला केज शहरातील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.अक्षय भैय्यांच्या या भावनिक सादेमुळे केज शहरा मधील आगामी राजकीय वातावरणाला आता पासूनच चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!