अध्यात्मिकसामाजिक

आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा होय – ह.भ.प. राधिकाताई सोळंके

केज/प्रतिनिधी

आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे.संस्काराने मोठी झालेली मुले मुली आई वडिलांचे जीवन हे धन्य करतात असे निरूपण ह.भ.प. राधिकाताई सोळंके यांनी मत व्यक्त केले.त्या केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथील प्रकाश आबासाहेब काळे यांच्या आई नावाने उभारलेल्या गृहप्रवेशा निमित्त हरिकीर्तन झाले.

आपुल्या हिता जो असे जागता,धन्य माता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा या अभंगावर निरुपण करताना कीर्तनातून प्रबोधनपर मत व्यक्त केले.विठ्ठलाचे अखंड चिंतन करण्याने मानवी जीवन धन्य होते. कर्म हीच पूजा असते सेवाभावी केलेले कार्य शांती आणि समाधान प्राप्त करून देते असे अभंगाद्वारे निरूपण केले.हरी कीर्तनास भजनी मंडळ,श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!