सामाजिक

साबला आनंदवाडी येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी ; महापुरुषांच्या विचारांना अभिवादन

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील साबला आनंदवाडी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती अर्थात ‘बुद्ध पौर्णिमा’ मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील ग्रामस्थ,महिला आणि तरुणांनी एकत्र येत भगवान बुद्धांच्या शांतता आणि समतेच्या विचारांना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी भगवान बुद्धांना वंदन केले आणि सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर ‘नमो बुद्धाय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.यावेळी कार्यक्रमास

मान्यवरांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाला उपसरपंच कचराबाई सरवदे,जिल्हा परिषद शाळा आनंदवाडी येथील मुख्याध्यापिका गीता अंडील मॅडम,शिवसेना तालुकाप्रमुख दत्तकुमार काकडे,ज्येष्ठ शिवसैनिक भागवत तात्या काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यासोबतच अक्षय सरवदे,विकास सरवदे, अनिल सरवदे,अनिल एकनाथ सरवदे, बाबाराजे सरवदे,अजित सरवदे,अमोल सरवदे, भैय्यासाहेब सरवदे, मोहन सरवदे,दयानंद जाधव,छत्रभुज सरवदे, उत्तम सरवदे,सुरेश सरवदे,राजेंद्र सरवदे, रावण कांबळे यांच्यासह गावातील तरुण मित्र मंडळ आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.भगवान बुद्धांचे विचार आजही जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे आहेत,अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी आनंदवाडी येथील युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!