सामाजिक

केजकरांच्या सेवेत नवा टप्पा,आ.नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश ; उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरचे लोकार्पण

केज/प्रतिनिधी

केज मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या, लोकप्रिय आ.नमिताताई मुंदडा यांच्या शुभहस्ते केज येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस सेंटरचे भव्य उद्घाटन नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

आधुनिक सुविधा: 

एकाच वेळी ५ मशिन्स द्वारे रुग्णांवर उपचार होणार,राज्यातील मानाचे स्थान

महाराष्ट्रात मंजूर झालेल्या केवळ ०९ केंद्रांपैकी एक केंद्र केज मध्ये! मोफत/सवलतीत उपचार मिळणार

 

केज व परिसरातील गरजू रुग्णांना आता उपचारासाठी इतरत्र शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही.या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सिव्हिल सर्जन डॉ.सोळुंके साहेब, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे साहेब, नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड,गटनेते हारुणभाई इनामदार, उपसभापती डॉ.वासुदेव नेहरकर,भाजप तालुका अध्यक्ष भगवान केदार, राहुल भैय्या गदळे,सर्व डॉक्टर,परिचारिका, पत्रकार बांधव आणि मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.केज आणि परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, जेणेकरून त्यांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळतील असेआ.नमिता मुंदडा यांनी उप जिल्हा रुग्णालय केज येथे लोकार्पण प्रसंगी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!