देवगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी


केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील देवगांव येथे दि.३० एप्रिल गुरुवार रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.देवगांव येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती निमित्ताने दि.३० एप्रिल गुरुवार रोजी सकाळी समाज मंदिरा समोरील भव्य प्रांगणात कृष्णा बँकेचे चेअरमन तथा माजी जि.प.सदस्य विजयकांत भैय्या मुंडे, सुरेश गायकवाड नवी मुंबई,उपसरपंच सुभाष मुंडे,रामू नागरगोजे, अमोल मुंडे,एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
या ठिकाणी महामानव तथागत गौतम बुध्द व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन बुध्दवंदना घेण्यात आली.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्याचे भीम जयंती उत्सव समीतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुष्पहार देऊन स्वागत केले.ही जयंती यशस्वी करण्यासाठी डाॅ.शरद गायकवाड, अर्जून गायकवाड, अरुण कांबळे,चिवळा गायकवाड,राणू कांबळे, लिंबाजी गायकवाड, दैवान कांबळे,विशाल गायकवाड,अजय कांबळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेऊन ही जयंती साजरी केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महादेव गायकवाड यांनी केले.



