स्वामी विवेकानंद शाळे मध्ये बाल गणेश कल्याण मंडळ आयोजित व्याख्यान मालेचा कार्यक्रम संपन्न
निरोगी शरीरासाठी स्वतःच रक्षक बनने आवश्यक आहे डॉ.स्नेहा भराडिया

केज/प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ संचलित,स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [ माध्यमिक विभाग ] शाळेमध्ये बालगणेश कल्याण मंडळाच्या वतीने दि.३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ या दरम्यान व्याख्यान मालेचा कार्यक्रम संपन्न झाला. या व्याख्यानमाले साठी परिसरातील व्याख्यात्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले जाते. यावर्षी दि.३० सप्टेंबर रोजी बाल गणेश व्याख्यानमालेचे पहिले पुष्प माजी सैनिक तथा कवी जनार्दन सोनवणे यांनी गुंफले.याप्रसंगी अध्यक्ष म्हणूनशाळेतील ज्येष्ठ शिक्षक अजय देशपांडे हे उपस्थित होते.तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे यांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी बाल गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शुभारंभाचे पुष्प गुंफताना”आपल्या जीवनातील शिस्तीचे महत्त्व “या विषयावर बोलताना जनार्दन सोनवणे म्हणाले की, शिस्त या शब्दाची उकल अशी केली की, शिस्त म्हणजे ‘शिष्य + इति’ अर्थातच या शब्दातून शिष्याने कसे वागावे याचे निर्देशन केले जाते.माणसाला त्याचे गुरू म्हणजेच आई आणि त्यानंतर शिक्षक शिस्तीचे धडे देत असतात.
माणूस हा आयुष्यभर निरंतर शिष्यच असतो. म्हणजेच शिष्याने नेहमीच शिस्तीत राहायला हवे.मोठे व्हायचे असेल तर केवळ शिस्त अंगी बाळगा.अध्यक्षीय समारोपात अजय देशपांडे म्हणाले की, शिक्षण हे संस्कारक्षम असले पाहिजे.आणि ते शालेय जीवनापासूनच आत्मसात केले पाहिजेत.आपले जगणे हे निस्वार्थ असले पाहिजे.तसेच परस्पर सहकार्याची भावना आपण स्वतःमध्ये वृंद्धीगत केली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हरी चौरे याने केले.तर आभार आदित्य सूर्यवंशी याने मानले.
दि.२ सप्टेंबर २०२५ रोजी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ” संस्कारक्षम शिवचरित्र “या विषया वर सेवानिवृत्त शिक्षक श्री.हनुमंत घाडगे यांनी गुंफले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह शिक्षक संदिप शेंडगे होते.याप्रसंगी बोलताना हनुमंत घाडगे म्हणाले, संस्कार हेअनुकरणातून होत असतात.विद्यार्थी अनुकरणातून शिकत असतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग हा विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अंधश्रध्देला कधीही प्रोत्साहन दिले नाही.शिवचरित्रातून आपल्याला परस्त्रीला मातेसमान वागणूक दयावी तसेच आई- वडिलांवर प्रेम करावे ही शिकवण मिळते राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने स्वराज्य स्थापने चा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांनी केला.सर्वधर्म समभावा ची शिकवण आपणास शिवचरित्रातून मिळते. मराठा मावळे (तसेच प्रदेशासाठी वापरला जाणारा शब्द) सैन्याला जोखीम देत असताना त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी शिवाजी महाराज घेत असत. आजकालचे राजकारण गलिच्छ झाले असून आज प्रत्येकाने शिवचरित्र आवश्य वाचावे.समाजात कसे वावरावे,सर्वधर्मसम भाव कसा असावा, राष्ट्रप्रेम कसे असावे.
ही सर्व मूल्ये समजून घेण्यासाठी शिवचरित्र वाचने आवश्यक आहे. विद्यार्थ्यांबर नव्हेच तर सकल समाजाला समानतेची शिकवण शिवचरित्राद्वारे मिळते. चंद्र-सूर्य-तारे आहेत तोपर्यंत शिवचरित्राची ख्याती असेल. अध्यक्षीय समारोपात संदिप शेंडगे म्हणाले, बदल घडवून आणण्या साठी फार मोठ्या संख्येची आवश्यकता नसते.परंतु योग्य दिशा व नेतृत्व समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आदित्य सूर्यवंशी यांनी केले.तर आभार संस्कृती जाधव हीने मानले.
दि.३ सप्टेंबर २०२५ रोजी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ” आरोग्य व आहार ” या विषयावर डॉ.स्नेहा भराडिया यांनी गुंफले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे या होत्या. याप्रसंगी बोलताना डॉ. स्नेहा भरडिया म्हणाल्या की,आजार होण्यापूर्वीच आपण दक्षता घेतली पाहिजे. सध्याच्या या धकाधकी च्या जीवनामध्ये दिनचर्या आयुर्वेदाच्या सहाय्याने पाळणे गरजेचे आहे.हितकारक गोष्टीचे मोजमाप म्हणजे ‘आयुर्वेद आयुर्वेदानुसार दिनचर्चा व ऋतुचर्या पाळणे.
विद्यार्थ्यांसाठी ७ ते ८ तास मुबलक झोप असावी. प्रकृतीनुसार आहारात बदल, वैयक्तिक स्वच्छता, पचनशक्ती चांगली राहण्यासाठीचा आहार, कोणत्याही आजाराचे मुळ हे पचनक्रिया असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी पचनशक्ती सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे.आजच्या काळातील नवनवीन पदार्थांचे सेवन कमी करून घरचे अन्न खाल्ले पाहिजे.खरं पाहता निरीक्षणातून बदल घडवून आणले पाहिजेत.स्वतःच स्वतःचे रक्षक बनने आजच्या काळात आवश्यक आहे. विद्यार्थी दशेत योग्य नियोजन व नियमन करून आपल्या आरोग्याचे व अभ्यासाचे संवर्धन करावे. अध्यक्षीय समारोपात शिवनंदा मुळे म्हणाल्या, “Precaution is always better than cure.” स्वतःच्या प्रकृतीचे स्वतःच निरीक्षण केले पाहिजे. चांगल्या आहारामुळे आपल्या शरीर सुदृढ बनते व त्यामुळे आपल्या सर्वांगीण विकासही होतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अस्मिता जमाले हिने केले तर आभार मोहिनी गुंड हिने मानले.
दि.४ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गीत- गायन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे,शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे या उपस्थित होत्या. सदरील स्पर्धेसाठी शाळेतील एकूण ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.सदरील बालगणेश कल्याण मंडळ व्याख्यानमाले साठी सांस्कृतिकविभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे सहाय्यक कल्याण आदमाने,सर्व विद्यार्थी पदाधिकारी अध्यक्ष मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे,उपाध्यक्ष अजय गुंड,सचिव मंजू गुंड,सहसचिव स्वरा राऊत,कोषाध्यक्ष जगदीश गलांडे, विद्यार्थीनी प्रतिनिधी कल्याणी मुंडे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.



