राजकीय

भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख यांचा नरेंद्र मोदी संघातर्फे सत्कार

बीड/प्रतिनिधी

भारतीय नरेंद्र मोदी संघाच्या वतीने बीड जिल्हा भाजपा कार्यालयास भेट देऊन भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख यांचा सन्मान सत्कार करण्यात आला या प्रसंगी संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊसाहेब घोडके,बीड जिल्हाध्यक्ष बाजीराव ढाकणे,केज तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील,किशोर कुलकर्णी यांच्यासह संघाचे अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शंकरजी देशमुख यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर पक्ष संघटन, कार्यकर्त्यांचे प्रश्न, तसेच आगामी राजकीय घडामोडींवर मार्गदर्शनपर चर्चा झाली.प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब घोडके यांनी आपल्या मनोगतात भाजपाच्या मजबूत संघटनासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे.शंकरजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटना अधिक बळकट होईल असे मत व्यक्त केले.

जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख यांनी सत्कारा बद्दल आभार मानत, पक्षविस्तार आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाजीराव ढाकणे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!