महाविद्यालये सामाजिक परिवर्तनाची केंद्र व्हावेत – प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील

केज/प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित. बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज व मराठवाडा साहित्य परिषद शाखा केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाड़मय मंडळ उद्घाटन व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणां मध्ये भाषेचे योगदान या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील केंद्रीय अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते. उद्घाटनपर मार्गदर्शना मध्ये बोलत असताना त्यांनी मराठी भाषेला केंद्र सरकारने दिलेला अभिजात भाषेच्या दर्जा याविषयी वास्तव व त्यातील दिशाभूल याविषयी आपले मत प्रकट केले.
भाषा हे मानवाच्या अभिव्यक्ती चे माध्यम आहे.नवीन शैक्षणिक धोरण 2020 याविषयी बोलत असताना परिसंवादाचे प्रमुख व्याख्याते प्राचार्य कमलाकर कांबळे सरांनी भाषेचे महत्त्व व नवीन शैक्षणिक धोरणा मध्ये वाड़मय मंडळ व भाषा विभागांचा सहभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फार महत्वाचा आहे या संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील,प्रमुख पाहुणे श्री.दादा गोरे, श्रीमान आतकरे व प्राचार्य कमलाकर कांबळे सर हे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य माधव फावडे सर यांनी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त महाविद्यालय व शालेय स्तरावरहोणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करावयास पाहिजे या विषयी आपले मतव्यक्त केले.या कार्यक्रमामध्ये बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज, भाषा विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रित सुरेश शिनगारे,चेअरमन वसंत पतसंस्था केज,श्री. बाळासाहेब लोखंडे मसाप केजकार्यकारणी सदस्य,श्री.धेडे सर प्राचार्य वसंत कनिष्ठ महाविद्यालय केज तसेच भाई मोहन गुंड सामाजिक कार्यकर्ते व शेकाप चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रशांत क्षीरसागर व प्रास्ताविक प्रा.डॉ. नवनाथ काशीद यांनी केले. कार्यक्रमाचेआभार प्रदर्शन प्रा.डॉ.चत्रभुज सोळंके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा.सुनील राऊत, प्रा.रामचंद्र केदार,प्रा. मनोज माने,प्रा.अनिल किर्दंत,प्रा.डाॕ. बाबासाहेब हिरवे,प्रा. डॉ.आशा बोबडे व सर्व प्राध्यापक बांधव बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम सुलभपणे पार पाडण्यास मदत केली.



