वाणिज्य

पतसंस्था व संचालक यांच्या साठी धारुर येथे प्रशिक्षण वर्ग शिबीर संपन्न 

धारुर/ प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म.पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर, मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने धारूर येथे पतसंस्था संचालक,कर्मचारी प्रशिक्षण वर्ग शिबीर घेण्यात आले दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर चे उपप्राचार्य श्री.एस.आर.कोळे, प्रमाणित लेखा परीक्षक सी.ए.खोडसे,एस.एस. ढगे यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणात योग्य कर्ज वाटप,ऑडिट गुण निकष,उपविधी दुरूस्ती CRAR,SLR,CD RATIO नफा विभागणी सहकार कायदा इत्यादी विषयावर माहिती व सविस्तर मार्गदर्शन चर्चा करण्यात आली.समारोप प्रसंगी मा. महादेव चोंडे,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,धारूर तथा संचालक,बीड जिल्हा सहकारी बोर्ड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन आभार प्रदर्शन,वर्ग संयोजन एस.आर.कोळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!