केज शहरातील नवसाला पावणाऱ्या राजमुद्रा गणपतीची पत्रकार बांधवाच्या हस्ते महाआरती संपन्न,दर्शना साठी भाविक-भक्तांची प्रचंड रिघ

केज/प्रतिनिधी
केज शहरातील नवसाला पावणारा राजमुद्रा गणेश मंडळाचा पंचायत समितीच्या मैदानावर उभारण्यात आलेला नवसाला पावणाऱ्या राजमुद्रा गणपतीच्या ११ व्या वर्षाच्या महोत्सवाला सुरुवात झाली आहे.रविवार दि.31आॕगष्ट रोजी केज येथील पत्रकार बांधवांच्या शुभहस्ते महाआरती संपन्न झाली यावेळी महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांची उपस्थिती होती.यावेळी राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने सर्व पत्रकार बांधव यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन पदाधिकारी यांनी सत्कार केला.यावेळी
भाविक भक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी केवळ केज तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्हाभरातून भक्तांचा ओघ सुरू आहे.श्रद्धावान भाविक गणपतीच्या चरणी आपले नवस अर्पण करून सुख,शांती, समृद्धीची प्रार्थना करत आहेत.गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंचायती समितीचे मैदान रोषणाईने उजळून निघाले आहे.
लहान-मोठ्यांसाठी मनोरंजनाचे आकर्षक झोके,रहाटपाळणे, विविध प्रकारचे खाऊ व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, खेळणी,कपडे,सजावटी च्या वस्तूंची दुकाने यामुळे उत्सवाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे.
महिलांसाठी खास कलात्मक वस्तूंची दुकाने,मुलांसाठी खेळणी आणि खाऊ पिऊची रेलचेल सुरू आहे.गणेश मंडळाच्या वतीने दैनिक सकाळी व संध्याकाळी आरती, विविध धार्मिककार्यक्रम भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.स्थानिक तसेच बाहेरगावच्या कलाकारांच्या कीर्तन व प्रवचनांनी भक्तांना आध्यात्मिक उभारी मिळत आहे.तरुण मंडळींच्या उत्साहाने मंडळाची आकर्षक सजावट,देखावे आणि दिव्यांची रोषणाई लक्षवेधी ठरत आहे.
दररोजच्या आरतीनंतर मंडळाच्या वतीने भाविकांसाठी प्रसादाचे वाटप केले जात असून शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थे साठी स्वयंसेवक मंडळ दिवसरात्र कार्यरत आहेत.पोलिसप्रशासन, नगरपंचायत आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने उत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.गणेश भक्तांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून आगामी दिवसांत अधिक भाविकांच्या गर्दीची अपेक्षा राजमुद्रा गणेश मंडळाचे सर्वेसर्वा अमर पाटील यांनी व्यक्त केली आहे.केज शहरातील राजमुद्रा गणपती उत्सव सांस्कृतिक,धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसह एक उत्सव सोहळा बनला असून गावागावातील भक्तांची उपस्थिती केज तालुक्यातील एकात्मतेचे दर्शन घडत आहे.विवीध धर्मातील नागरिक,महिला,बाळ गोपाळ या उत्सवात आनंद लुटत आहेत.



