१९ जणांचे रक्तदान, महाराष्ट्र सांस्कृतिक गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील देशपांडे गल्लीत असलेले महाराष्ट्र सांस्कृतिक गणेशमंडळ हे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले असून मागील कित्येक वर्षां पासून मंडळ सामाजिक उपक्रम राबवत आहे. शनिवारी या मंडळातर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १९ जणांनी रक्तदान केले व हे रक्त शासकीय रुग्णालयाच्या रक्तदान महालॅबला दिले.
रक्तदान शिबिरात शैलेष गोस्वामी,सागर दिक्षित, मनोज जोशी,अवधूत देशपांडे,डॉ.प्रज्वल देशपांडे,अमिर नवाब, अक्षय देशपांडे,स्वप्नील पत्की, सुमित केजकर , अजिंक्य सावरगांवकर, अमोघ कुलकर्णी,अनंत औटी,मंदार आराध्ये, आर्य झक्कर,अनिरुद्ध सावरगांवकर,स्वप्नील स्वामी,समर्थ पोकळे पुराणिक यांनी रक्तदान केले.त्यांचे रक्त हे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयाच्या महालॅबला पाठवण्यात आले आहे. रुग्णालयाच्या रक्त पेढीत संकलित केले आहे.



