संभाजी ब्रिगेडच्या बीड जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल राहुल खोडसे यांचा सत्कार संपन्न

केज/प्रतिनिधी
नेतृत्व व कर्तुत्व कोणा कडून उसने घेता येत नाही ते स्वतःलाच निर्माण करावे लागते, नायगाव येथील भुमी पुत्र कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तुत्वाने व नेतृत्वाच्या माध्यमातून केज तालुक्यामध्ये सामाजिक स्तरातून नेहमीच पुढाकार घेऊन प्रशासनाच्या माध्यमा तून सामाजिक कार्य पार पडणे हा सुरज खोडसे यांचा हातखंडा, सदर सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री.
मनोज आखरे व महा सचिव सौरभ खेडेकर, प्रदेश प्रवक्ते श्री.गंगाधर बनबरे व सर्व प्रदेश कार्यकारिणीच्या उपस्थितीत त्यांना बीड जिल्हा संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली त्या अनुषंगाने सोमवार दि.25 आॕगष्ट रोजी श्री.खोडसे सी.ए. लेखा परीक्षक यांच्या कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार करून पुढील यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी श्री.एस.एस ढगे,श्री.बलभीम खोडसे,श्री.भारत खोडसे,श्री.कमलाकर चव्हाण व श्री.अभिषेक ताकतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.



