नायगाव येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा,मांजरा धरण भरल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण

केज/प्रतिनिधी
बैलपोळा हा शेतकऱ्यांचा खास आणि महत्त्वाचा सण आहे.शेतामध्ये राबणाऱ्या बैलांच्या सन्मानासाठी हा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात मेहनत करणाऱ्या बैलांना या दिवशी विश्रांती देऊन प्रत्यक्ष आपल्या बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा मोठ्या आनंदाने व उत्साहाने शेतकरी श्रावण महिन्यात अमावस्याला हा सण प्रतिवर्षी साजरा केला जातो.त्याचप्रमाणे केज तालुक्यातील नायगाव येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बैलआपला पोशिंदा आहे.त्यांचा मान राखण्यासाठी हा सण मोठ्या कृतज्ञतेने व आनंदाने नायगांव साजरा करण्यात आला.
केज तालुक्यात असलेले मांजरा धरण काठोकाठ भरलेले असल्याने या वर्षीच्या बैलपोळयाचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आता दोन वर्ष पाणी शेतीसाठी पुरणार आहे त्यामुळे शेतकरी आनंदोत्सव करत पोळा सण साजरा करत आहे असे नायगाव येथील रहिवासी प्रमाणीत लेखा परीक्षक श्री. चत्रभुज खोडसे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.



