सांस्कृतीक
अंबाजोगाई येथील कपील गणेश मंदिर येथे रविवारी प्रशांत गाजरे यांचे तबला वादन

अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील कपील गणेश मंदिर येथे संगीत साधना मंच,आदर्श गणेश प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता आदर्श वसाहती मधील कपिल गणेश मंदीर येथे शास्त्रीय संगीत साधक व रसिकांसाठी नांदेड येथील प्रख्यात तबला वादक प्रशांत गाजरे यांचे स्वतंत्र तबला वादन होणार आहे. संवादिनीवर परभणी येथील मंगेश जवळेकर हे साथ संगत करतील.
या मासिक संगीत सभेचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



