रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर ) पक्षाच्या बिड जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार बाळासाहेब जाधव यांची निवड

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील उमरी या गावचे रहिवाशी पत्रकार बाळासाहेब मधुकर जाधव यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर)या पक्षाच्या बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाली आहे.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की,केज येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक १२ आॕगष्ट रोजी दुपारी ३ वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)या पक्षाची बैठक संपन्न झाली.या बैठक प्रसंगी बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी बाळासाहेब मधुकर जाधव यांची निवड करण्यात आली.

ही निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाचे राष्ट्रीय नेते दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष भगवंत आप्पा वायबसे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.या निवडीमुळे बाळासाहेब जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष भगवंत आप्पा वायबसे,मराठवाडा प्रवक्ता ज्ञानेश्वर गिरी, मराठवाडा संपर्कप्रमुख सौ आम्रपाली गजेशिव, महिला केज तालुका अध्यक्ष बचुटे मॅडम, महादेव केदार,किरण कसबे,विशाल नवगिरे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) हा पक्ष अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात लढणारा आणि रस्त्यावर उतरून न्याय मागणार आहे,यापक्षाचे नेते दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा हा पक्ष आहे. विनाकारण कोणत्याही समाजावर अन्याय अत्याचार झाला तर हा पक्ष पूर्ण ताकतीने रस्त्यावर उतरेल,माझी बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड केल्याबद्दल राष्ट्रीय नेते दीपक भाऊ निकाळजे व मराठवाडा अध्यक्ष भगवंत आप्पा वायबसे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
-बाळासाहेब जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर) बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख



