छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिवस्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे,किल्लेधारूर सकल मराठा समाजाची मागणी

किल्लेधारूर/प्रतिनिधी
किल्लेधारूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालण्यासाठी हायड्रोलीक सीडी बसविण्यात यावी तसेच संरक्षित कठडे(जाळी) बसविण्यात यावी. विद्युत रोषणाई करण्यात यावी तसेच शिवस्मारकाच्या आजूबाजूला लावण्यात येणारे बॅनर फलक लावण्यात येऊ नये.
शिवस्मारकाची स्वच्छता करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय किल्लेधारूर यांना समस्त शिवप्रेमीच्या वतीने निवेदन देण्यात आले.याप्रसंगी निवेदनावर संदीपभैय्या शिनगारे,बाळू भाऊ कुरुंद,प्रशांत शिनगारे, पवन धोत्रे,इंजि.जनक फुन्ने,दादा शेरकर,रोहित गायकवाड,ॲड.युवराज फुन्ने,निलेश शिनगारे, आदिनाथ शिनगारे यांच्यासह अनेक शिवप्रेमीच्या सह्याचे निवेदन देण्यात आले आहे.



