सामाजिक

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात जिजामाता व विवेकानंद जयंती व्याख्यान,वक्तृत्व, गीतगायन,कथाकथन कार्यक्रम घेवून संपन्न

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक १२ जानेवारी २०२६रोजी राष्ट्रमाता,राजमाता, स्वराज्यजननी जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती वाचनालया च्या वाचन कक्षात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम जिजामाता व विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.

त्यानंतर ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांचे स्वराज्य जननी जिजामाता व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद या विषयावर व्याख्यान झाले.राष्ट्रमाता,राजमाता, स्वराज्यजननी जिजामाता हे १६ व्या शतकातील तेजपुंज व्यक्तीमत्व होते. ज्यांनी स्वराज्याला जन्म दिला,दोन छत्रपती घडविले छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज एकाने स्वराज्य निर्माण केले तर दुसऱ्याने स्वराज्याचे रक्षण केले.या कार्यात स्वराज्यजननी जिजामाता यांचे खुप मोठे योगदान होते असे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.

युगप्रवर्तक विवेकानंद यांनी संपूर्ण विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य युवकात पाहिले व युवकांचे प्रेरणास्त्रोत बनले असे प्रतिपादन डाॅ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानेश्वरी पुंड,श्रुती पुंड, वेदिका गायकवाड, अनुष्का गायकवाड,लक्ष्मी चौरे यांनी सहभाग घेवून वक्तृत्व स्पर्धेतून जिजामाता व विवेकानंद यांच्या विचारांची मांडणी केली.गीतगायन स्पर्धेत अनुष्का गायकवाड, वेदिका गायकवाड,सोहम गायकवाद,स्वरा गायकवाड,बाळासाहेब गायकवाड यांनीराष्ट्रमाता, राजमाता,जिजामातेचे कर्तृत्वगीत गायन स्पर्धेतून मांडले.

कथाकथन स्पर्धेत एस.के.वैरागे,भारत गायकवाड, बाळासाहेब गायकवाड,बबन पुंड यांनी जिजामाता व विवेकानंद उलगडून सांगीतले.प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच रामराजे गायकवाड, माजी ग्रा.प.सदस्य रमेराराव गायकवाड, रावसाहेब जाधव यांची उपस्थिती होती.सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाला विद्यार्थी,विद्यार्थिनी,युवक,वाचक,जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!