लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शुभांगी साठे यांचे घवघवीत यश ; वाटेगाव सह महाराष्ट्राचा मान उंचावला

वाटेगाव/प्रतिनिधी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या भूमीत जन्मलेल्या कन्येने आपल्या प्रज्ञा,प्रतिभा आणि अथक परिश्रमाच्या जोरावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.वाटेगाव येथील शुभांगीताई साठे यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश करत संपूर्ण महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या शुभांगी ताईंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण,स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक भान यांचा समतोल साधला.त्यांच्या या यशा मुळे वाटेगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शुभांगीताई साठे यांचा प्रशासकीय सेवेतला प्रवास लोकहितासाठी अधिक यशस्वी, कर्तव्यदक्ष आणि प्रेरणादायी ठरो,अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.त्यांच्या या यशामुळे अनेक तरुण, तरुणींना,विशेषतःग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी दिशा व प्रेरणा मिळणार आहे. शुभांगीताई साठे यांना खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



