स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक संपन्न

बीड/प्रतिनिधी
दि.9 सप्टेंबर 2025 मंगळवार रोजी शिवसेने ची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी शिवसेनेचे विभागीय सचिव अशोकजी पटवर्धन, संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे,जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळक, जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप,जिल्हा प्रमुख स्वप्निल भैया गलधर,शिवसेनामहिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रकलाताई बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी उपस्थित शिवसेना केज विधान सभा प्रमुख दादासाहेब ससाणे,शिवसेना केज तालुकाप्रमुख पृथ्वीराज सुरेशराव पाटील, शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख दत्तकुमार काकडे,शिवसेना उप तालुकाप्रमुख महेंद्र चाटे, शिवसेना तालुका प्रमुख महिला आघाडी जयाताई राऊत, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख वैशालीताई सांगळे, शिवसेना उप तालुका प्रमुख दादासाहेब पटाईत, सुनील भाऊ पटाईत आदी मान्यवर उपस्थित होते.



