बोरगावमध्ये पोलिसांचा धडक कारवाई २२ देशी दारूच्या बाटल्या जप्त

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बोरगाव (बु.)येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्या एका इसमा वर कारवाई करून २२ सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गु.र.नं. 488/2025,कलम 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार,कल्याण बापु शिंदे वय 65,रा.बोरगाव बु.हा विनापरवाना देशी दारूची विक्री करीत होता.फिर्यादी बाबासाहेब रंगनाथ बांगर वय 49,पोलीस हवालदार,पोलीस ठाणे केज यांच्या तक्रारी वरून ही कारवाई करण्यात आली.
दि.९ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पोलीस पथकाने छापा टाकून बॉबी संत्रा कंपनीच्या ९० एम.एल. क्षमतेच्या २२ सिलबंद प्लास्टिक बाटल्या जप्त केल्या.जप्त मालाची एकूण किंमत ८८० रुपये इतकी आहे.
ही कारवाई पोलीस हवालदार सोनवणे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस हवालदार मुरकुटे हे करीत आहेत. त्यांना मार्गदर्शन प्रभारी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी केले आहे.



