१५ ऑगस्ट ‘डिजिटल इंडिया फांऊंडेशन डे’ जाहिर करा,खा.बजरंग सोनवणे यांची पंतप्रधान मोंदींकडे मागणी

बीड/प्रतिनिधी
भारताच्या इंटरनेट युगाला ३० वर्षे पूर्ण झाले असून १५ ऑगस्ट हा ‘डिजिटल इंडिया फाउंडेशन डे’ जाहीर करण्याची मागणी खा.बजरंग सोनवणे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व संचारमंत्री ज्योतिरादित्य राजे शिंदे यांच्याकडे केली आहे.
बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रात म्हटले आहे की, भारतामध्ये सार्वजनिक इंटरनेटसेवा सुरू होऊन यंदा ३० वर्षे पूर्ण होत आहेत.१५ ऑगस्ट १९९५ रोजी विदेश संचार निगम लिमिटेड मार्फत सार्वजनिक इंटरनेटचा शुभारंभ झाला होता.या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय संचार मंत्री यांना पत्र लिहून १५ ऑगस्ट २०२५ हा दिवस ‘डिजिटल इंडिया फाउंडेशन डे’ म्हणून साजरा करण्याची मागणी केली आहे.सन १९८६ साली सुरु झालेली भारताची डिजिटल क्रांती ही केवळ व्यापारापुरती मर्यादित नव्हती,तर ती शिक्षण,संशोधन व आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक दूरदृष्टीपूर्ण पाऊल होते. त्यांनी आपल्या पत्रात भारताच्या इंटरनेट प्रवासातील काही महत्त्वाचे टप्पे अधोरेखित केले आहेत १९८६ शिक्षण व संशोधन संस्थांसाठी इंटरनेट सेवा,१९८७ जिल्हास्तरावर शासन व नियोजन संस्थांना कनेक्टव्हिटि,१९९५ सार्वजनिक इंटरनेट सेवा सुरू,१९९८ खासगी इंटरनेट कंपन्यांसाठी दरवाजे खुले,२००५ ई-कॉमर्स, टेलिमेडिसिन, ऑनलाईन शिक्षणा साठी गती, २०१६ स्वस्त मोबाइल डेटा, युपीआय आधार या प्रणालींची निर्मिती, २०२५ तंत्रज्ञानात जागतिक नेतृत्वाची दिशा देण्याचे काम झाले आहे.आज भारताचा तरुण आयटी निर्यात,स्टार्टअप्सआणि डिजिटली करणाच्या बाबतीत तो जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे.डिजिटल वाटचाल बाजारपेठेच्या उद्देशाने नव्हे तर सार्वजनिक हित लक्षात घेऊन सुरू झाली होती, आणि आज ती भारताला तंत्रज्ञानाच्या आघाडीवर घेऊन गेली आहे असेही म्हटले आहे.
खा.सोनवणेंच्या महत्वाच्या मागण्या
१५ ऑगस्ट २०२५ ला ‘डिजिटल इंडिया फाउंडेशन डे’ म्हणून मान्यता द्यावी.
इंटरनेट,एनआयसी या संस्थांचे योगदान औपचारिकपणे गौरवावे.
‘राष्ट्रीय डिजिटल संग्रहालय’ स्थापन करून भारताच्या इंटरनेट प्रवासाचे दस्तऐवजीकरण करावे.