राजकीय

अंबाजोगाई येथे पासपोर्ट सेवा केंद्र स्थापनेची खा.बजरंग सोनवणेंची केंद्रीय दळणवळण मंत्र्यांकडे मागणी

केज/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई परिसरा तील हजारोनागरिकांना पासपोर्ट सेवांसाठी नांदेड,लातूर किंवा पुणे या सारख्या दूरच्या शहरांमध्ये जावे लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिक यांना होणाऱ्याअडचणी लक्षात घेऊन अंबाजोगाई येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) स्थापनेची मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे.

अंबाजोगाई शैक्षणिक, आरोग्य,प्रशासकीय दृष्टिकोनातून महत्वाची आणि बीड जिल्ह्यातील प्रमुख नगरी आहे.तर जिल्ह्यासह अंबाजोगाई परिसरातील हजारो नागरिकांना पासपोर्ट सेवांसाठी नांदेड,लातूर किंवा पुणे या सारख्या दूरच्या शहरांमध्ये जावे लागते.त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिक यांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अंबाजोगाई येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) स्थापन करणे गरजेचे आहे.हे केंद्र स्थापन झाल्यास अंबाजोगाई सह केज,धारूर,परळी, माजलगाव याभागातील लोकांना देखील याचा लाभ होणार आहे.या मागणीचे निवेदन खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची दिल्ली येथे भेट घेऊन सादर केले.तर या आपल्या पाठपुराव्या तून लवकरच ही सुविधा अंबाजोगाईत सुरु होईल अशी खात्री ही खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!