प्रशासकीय

केज तहसीलदारांची धडक कारवाई,एका दिवसात पाच शिव रस्त्यांचे अतिक्रमण काढले 

केज/प्रतिनिधी

दि.२९ मे शुक्रवार रोजी केज तालुक्यातील लव्हुरी -कोठी या गावचे जुने अनेक वर्षापासून अतिक्रमण करून शिव रस्ते बंद केलेले होते. दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा रस्ता खुला करण्याची मागणी नियमा प्रमाणे तहसील कार्यालय, केज यांच्याकडे अनेक वर्षा पासुन होत असल्याने केजचे प्रशिक्षणार्थी तहसीलदार शुभम पवार यांनी आपल्या कर्मचारी फौजफाट्यासह मस्साजोग च्या मंडळ अधिकारी वैशाली देशमुख,ग्राम महसुल अधिकारी सज्जा लव्हुरी चे ग्राममहसुल अधिकारी अशोक चटप,भूमि अभिलेख कार्यालय केज चे सुदाम चौरे आणि केज पोलीसांच्या बंदोबस्तात.

शुक्रवार दि.२९ मे २०२६ रोजी लव्हुरी-कोठी येथील शिव रस्ता अतिक्रमण खुले केले तसेच लव्हुरी येथील गट नं.११० व १११ मधील पाच सर्वे नं. मधील अतिक्रमण मोकळे केले एकाच दिवसात पाच रस्ते मोकळे केल्याने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सुटल्याने प्रशिक्षणार्थी  तहसीलदार शुभम पवार यांचे शिस्तप्रिय व धाडसी अधिकारी म्हणुन सर्वत्र चर्चा होऊन सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

आमच्या प्रतिनिधीने कोठी येथील सरपंच बप्पा डोंगरे यांना संपर्क साधला असता शिव रस्त्याचा प्रश्न सोडविला याबद्दल प्रशिक्षणार्थी तहसीलदार शुभम पवार यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करत आहे असे बप्पा डोंगरे सरपंच, कोठी यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!