उद्योगसामाजिक

केज येथे पायल ब्युटी पार्लर येथे एक महिन्याचे कॉस्मेटॉलॉजी ट्रेनिंग संपन्न

केज/प्रतिनिधी

दिनांक २७ मे २०२६ रोजी पायल ब्युटी पार्लर केज येथे एक महिन्याचे कॉस्मेटोलॉजी ट्रेनिंग तरुण उद्योजक मुली व महिलांसाठी घेण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पायल ब्युटी पार्लरच्या प्रो.प्रा. सायरा सय्यद मॅडम यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.यात त्यांनी कॉस्मेटोलॉजी म्हणजे ब्युटीपार्लर मध्ये असलेल्या विविध ट्रेनिंग फेशियल, ब्लिचिंग,क्लीनअप,मसाज सारख्या विविध प्रकारचे प्रशिक्षण चालू असलेल्या बॅच मधील प्रशिक्षणार्थींना सखोल सराव घेऊन शिकवले तसेच कॉस्मेटोलॉजी हे भविष्यात नवीन उद्योजकांसाठी व्यवसायाचे एक साधन बनू शकते हे स्वतःच्या उदाहरणातून समजावून सांगितले,तसेच नवीन इच्छुक प्रशिक्षणार्थींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच उद्योजकांसाठी गव्हर्मेंटच्या असलेल्या विविध योजनांचे मार्गदर्शन श्री.जी.बी. चौधरी सर यांनी प्रशिक्षणार्थींना केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. जी.बी. चौधरी सर व समन्वयक कु.तृप्ती शिंदे तसेच सर्व प्रशिक्षणार्थींनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन केले.या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!