सामाजिक
निलेश सत्वधर हा ३३ वर्षीय तरुण कटिंग करून येतो म्हणून घरातून गेला असून दहा महिन्यापासून बेपत्ता, केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल


केज/प्रतिनिधी
केज येथील निलेश प्रभाकर सत्वधर,रा. केज.ता.केज.जि. बीड. वय ३३,वर्षे,रंग गोरा, नाक सरळ,बांधा मजबूत,डोळे मोठे,उंची ५” फूट ७ इंच,अंगात आकाशी रंगाचे फूल बाहयाचे शर्ट,ग्रे कलरची पँट,पायात शुज दाढी मिशा ठेवतो,डोक्याचे केस काळे,अशावर्णनाचा मुलगा घरातून बाहेरून कटिंग करून येतो म्हणून कोणालाही न सांगता कोठेतरी निघून गेला असून तो दि,०८ जुन २०२५ पासून बेपत्ता आहे अशी तक्रार सुनिता प्रभाकर सत्वधर यांच्या तक्रारी वरुन केजपोलिस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल केली असून सदरील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.१६७३ बाळासाहेब अहंकारे हे करत आहेत.



