दोन विवाहित महिलांचा सासरी छळ ; सासरच्या आठ जणाविरुद्ध गुन्हा नोंद

केज/प्रतिनिधी
कार घेण्यासाठी माहेर हून २० लाख रुपये घेऊन येत नसल्याचे कारणा वरून एका ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तीला घराबाहेर हाकलून दिल्याची घटना तेरखेडा ता.वाशी येथे घडली.तर दुसऱ्या घटनेत एका २७ वर्षीय विवाहितेचा कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणत नसल्या वरून शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना आढाळा ता.कळंब येथे घडली.या दोन्ही घटनेप्रकरणी पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

केज शहरातील फुलेनगर माहेर असलेल्या प्रतिमा प्रवीण उर्फ बबलू सरवदे वय ३० वर्षे या विवाहिते चा २०१६ मध्ये तेरखेडा ता.कळंब येथील प्रवीण बाबासाहेब सरवदे सोबत विवाह झाला होता.लग्ना नंतर दोन मुली झाल्या. त्यानंतर तुझ्या आई वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही,म्हणून कार घेण्यासाठी २० लाख रुपये माहेरहून आणण्या साठी पतीसह सासरच्या लोकांनी तगादा लावला. प्रतिमा सरवदे हिने आई वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे तेवढी रक्कम आणण्यास नकार दिल्याने तु येथे राहु नकोस.तु जर येथे राहिली तर तुझा काटाच काढुत अशा जिवे मारण्याच्या धमक्या देऊन घराबाहेर हाकलून दिले.अशी फिर्याद प्रतिमा सरवदे यांनी दिल्यावरून पती प्रवीण सरवदे,चुलत सासरे सुहास सरवदे,चुलत सासू सिमा सरवदे,चुलत दिर संस्कार सरवदे, चुलत नणंद सायली सरवदे अशा सासरच्या ५ जणांंविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दुसऱ्या घटनेत केज तालुक्यातील वाघे बाभूळगाव माहेर असलेल्या प्रतिभा शशिकांत खंडागळे वय २७ वर्षे हिचा २०२४ मध्ये आढाळा ता.कळंब येथील शशीकांत बापुराव खंडागळे याच्यासोबत विवाह झाला होता.लग्ना नंतर त्यांना एक मुलगी झाली.
कर्ज फेडण्यासाठी आई वडिलांकडुन पैसे आणण्यासाठी तगादा लावून चारित्र्यावर संशय घेत पती,सासू,सासऱ्याने शारीरिक व मानसिक छळ करीत दुसरे लग्न करायचे आहे,आमची मुलगी आम्हाला दे म्हणत नसता तुझ्या माहेरी येऊन आत्महत्या करण्याची धमकी पती शशिकांत खंडागळे याने दिली अशी तक्रार प्रतिभा खंडागळे यांनी केज पोलिसात दिल्यावरून पती शशिकांत खंडागळे, सासू कौशल्या खंडागळे, सासरे बापुराव खंडागळे या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.दोन्ही ही प्रकरणी पोलीसनिरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालु आहे.



