प्रा.अनुराधा उगले यांना रसायनशास्त्र विषयातील पीएचडी प्रदान

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील रसायनशास्त्र विषयाच्या अध्यापिका प्रा.डॉ. अनुराधा उगले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने रसायन शास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.”pH metric study of complexes of some biologically active drugs with transition metal ions or lanthanides”(पीएच मॅट्रिक स्टडी ऑफ कॉम्प्लेक्स ऑफ सम बायोलॉजिकली ऍक्टिव्ह ड्रग्स विथ ट्रांजेक्शन मेटल आयन्स ऑर लॅन्थानाइट्स) हा त्यांचा पीएचडी चा विषय होता. या विषयात त्यांनी सखोल अभ्यास करून एक उत्कृष्ट प्रबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सादर केला.त्यांच्या या उत्कृष्ट संशोधनाबद्दल विद्यापीठाने त्यांना आज पीएचडी पदवी प्रदान केली.यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून लोकनेते बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज येथील रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल किर्दंत यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
आजच्या झालेल्या या मौखिक परीक्षेच्या वेळी चेअरमन म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.शंकरवार सर तसेच बहिस्थ परीक्षक म्हणून शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. राशीकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा.डॉ. अनुराधा उगले यांच्या या यशाबद्दल कृष्णाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव व जनविकास महाविद्यालय, बनसारोळा येथील विद्यमान प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, कोषाध्यक्ष मा.सौ.गोरे मॅडम,संस्थेच्या अध्यक्षा सौ.राजमती ताई तट, संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री. युवराज (दादा) गोरे,मा. श्री.चंद्रकांत (बाप्पा) गोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच त्यांच्या या उत्कृष्ट संशोधनाबद्दल राजमाता जिजाऊ महाविद्यालय,किल्ले धारूर येथील प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे,योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.जाधवर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ.साठे, योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाईचे प्राचार्य डॉ. कानिटकर सर तसेच जनविकास महा विद्यालय,बनसारोळा येथील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व अनेक आजी व माजी विद्यार्थी, सर्व नातेवाईक,मित्रमंडळी तसेच सर्व परिसरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.


