आनंदऋषीजी हॉस्पिटल बीड येथे सरजुबाई मोहनलालजी शर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्त मोफत वैद्यकीय शिबीराचे आयोजन


बीड/प्रतिनिधी
ह.भ.प.समाधान महाराज शर्मा व ह.भ.प. संतोष महाराज शर्मा, कन्या सौ.शोभा सुनील दायमा यांच्या मातोश्री सरजुबाई मोहनलालजी शर्मा (सुंटवाल) केज यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल बीड येथे मोफत नेत्र तपासणी,मधुमेहरुग्णांची रक्त-लघवी तपासणी व सामान्य रुग्णांची मोफत तपासणी शिबीर दि.२३ मे २०२६ ते दि.१५ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.बीडजिल्ह्याचे सुपूत्र ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांच्या मातोश्री सरजुबाई शर्मा यांनी १०१ व्या वर्षात पदार्पण केले.
या निमित्ताने सकल जैन समाज बीड यांच्यावतीने मातोश्रींच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल बीड येथे सामाजिक वैद्यकीय उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे सुपूत्र ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांनी आपल्या बीड जिल्ह्याचे संत-महंतांचे विचार समाजात पेरुन त्यांनी आगळी-वेगळी ओळख बीड जिल्ह्याची केलेली आहे.अशा महान मातोश्री यांनी १०० वर्ष पूर्ण करुन १०१ वर्षात पदार्पण केलेले आहे. त्यांचा वाढदिवस आगदी सेवाभाव या कार्याने सकल जैन समाज बीड यांनी २३ मे २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधी मध्ये नेत्र तपासणी, मधुमेह रुग्णांची रक्त- लघवी तपासणी, सामान्य रुग्णांची तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे सर्व आयोजन बीड शहरातील जैन समाजातील दानशुर व्यक्तींच्या मदतीने संपन्न होत आहे.बीड शहरातील बंब नगरी,सावता माळी चौक येथे दि.१८ मे ते २५ मे या दरम्यान अतिरुद्र महायज्ञ व शिव महापुराण कथा सोहळा संपन्न होत आहे.अशा शुभप्रसंगी महाराजांच्या मातोश्रींचा आगळा- वेगळा वाढदिवस जैन समाजाच्या वतीने सर्व सामान्य रुग्णांची वैद्यकीय सेवा करुन अतिशय स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे. तरी कथे प्रसंगी उपस्थित सर्व कुटूंबाच्या व्यक्तींनी व शहरातील पंचक्रोशी तील शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा.
विशेष आता शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे.ज्या विद्यार्थ्यांना डोळ्याला चष्मा आहे किंवा डोळ्याला त्रास आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी नेत्र तपासणी करुन घ्यावी असे आवाहन सकल जैन समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.नेत्र तपासणीची वेळ सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत असणार आहे. मधुमेह रुग्णांची तपासणी सकाळी ७ ते सायं. ७पर्यंत,सामान्य रुग्णांची तपासणी सकाळी १० ते सायं.८ पर्यंत करण्यात येणार आहे.तरी सर्व भाविकांनी या तपासण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सकल जैन समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.



