
केज/प्रतिनिधी
शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक क्रांती घडवून आणणारे अग्रगण्य केंद्र म्हणून ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित,शारदाबाई पवार बी.एससी.नर्सिंग कॉलेजने(कॉलेज कोड ०९१८४) बारामती (शारदानगर) आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.अनुभवी शिक्षक वृंद,अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिलाजाणारा भर,यामुळे या महाविद्यालयाने सातत्याने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा यशस्वीपणे जपली आहे.
अत्याधुनिक कॅम्पस आणि जागतिक दर्जाच्या सुविधा शारदानगर येथील निसर्गरम्य आणि सुसज्ज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययना साठी उत्तम वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाविद्यालयात खालील वैशिष्ट्यपूर्ण सुविधा पुरवल्या जातात.
अद्ययावत प्रयोगशाळा (Labs):-
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानाचा सराव करता यावा यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज लॅब्स.
मान्यताप्राप्त हॉस्पिटलची सोय:-
प्रत्यक्ष कामाचा अनुभव (Clinical Training) मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना नामांकित व मान्यताप्राप्त हॉस्पिटल्स मध्ये प्रशिक्षणाची सुवर्णसंधी दिली जाते.
सुसज्ज क्रीडांगण:-
विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासा साठी खेळाचे अद्ययावत मैदान.सुशांत निवास व भोजन व्यवस्था:- लांबून येणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सुरक्षित सोय (हॉस्टेल) आणि दर्जेदार जेवणाची उत्तम व्यवस्था.
विद्यार्थी-केंद्रित व संवेदनशील प्रशासन
या महाविद्यालयाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे येथील अत्यंत अनुभवी,कुशल आणि संवेदनशील शिक्षक व कर्मचारी वर्ग होय. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण टीम सदैव तत्पर असते.
विशेषतःआर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर वैयक्तिक आणि जातीने लक्ष देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्याचे मोलाचे काम येथे केले जाते.
मार्गदर्शक व खंबीर नेतृत्व
महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल विना जाधव मॅडम यांच्या कुशल आणि अनुभवी नेतृत्वा खाली संपूर्ण कॉलेजची वाटचाल अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे.विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या प्राचार्या विना जाधव मॅडम यांच्यासहप्राध्यापक वर्ग प्रभावती रणपिसे मॅडम,शितल सणस मॅडम,तेजश्री धेंडे मॅडम,रसिका मॅडम, ऋषिकेश सर,सिद्दीक सर.प्रशासकीय कर्मचारी क्लार्क गणेश काळेआणि वैभव ताटे या सर्व टीम च्या अहोरात्रपरिश्रमामुळे आणि योग्य मार्गदर्शना मुळेच शारदाबाई पवार बी.एससी. नर्सिंग कॉलेज हे परिचारिका (Nursing) क्षेत्रात करिअर करूइच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रा तील एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह अध्ययन केंद्र ठरले आहे.तरी बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहे.



