जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत प्रवेशोत्सव मेळावा संपन्न.

केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्रकेज मुलांची ता.केज शाळेत इयत्ता पहिली वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या लाभार्थ्यांचे प्रथम पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवा निमित्त स्वागताच्या स्वागतासाठी विविध स्टॉल लावण्यात आले होते.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत कुंबेफळचे विद्यमान सरपंच श्री. अविनाश पांचाळ,सौ. श्रध्दा विष्णु थोरात उपसरपंच, शिक्षणप्रेमी श्री.विष्णु थोरात आबा, शाळा व्यवस्थापन समिती विद्यमान अध्यक्ष सौ.शालु विजय थोरात, उपाध्यक्ष सौ.अश्विनी श्रीकांत थोरात,श्री. प्रकाश थोरात उर्फ बंडु आबा,सुरेश नाना थोरात, किशोर तात्या थोरात या शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी नवागतांचे स्वागत केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष श्री मधुकर थोरात, अंगणवाडी ताई श्रीमती उषाताई नागनाथ शेंडगे, श्रीमती अश्विनी रत्नाकर इंगोले,श्रीमती रमण भागवत यादव, अंगणवाडी मदतनीस, मातापालक, शिक्षणप्रेमी नागरिक, महिला, एसबीआय बॅंक अंबाजोगाईचे डेप्युटी मॅनेजर श्री.धनराज गौतमराव थोरात, कुंबेफळचे नवनिर्वाचित पोलीस पाटील सौ.नेहा धनराज थोरात,जीडीएस एबीपीएम सौ.प्रियंका ऋषिकेश थोरात, पीएम पोषण शक्ती निर्माण योजना कामगार सौ. स्वर्णमाला पवार,सौ. अनिता पवार या शाळेचे प्राथमिक पदवीधर डॉ. श्री.रामकिशन ग्यानबा मुळे सर,गणित विज्ञान चे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री.संदीप मेघराज ठोंबरे सर, सहशिक्षक श्री.आकाश दत्तु लोंढे सर, श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम,श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम,श्री.राहुल बजरंग बचुटे,श्री. आबासाहेब तुळशिराम धपाटे शाळेतील सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी कुंबेफळचे नवनियुक्त पोलिस पाटील सौ.नेहा धनराज थोरात, एसबीआय बॅंक अंबाजोगाई चे सीबीओ यांची डेप्युटी मॅनेजर पदी पदोन्नती झालेले श्री. धनराज गौतमराव थोरात जीडीएस एबीपीएम पदी नवनियुक्त झालेल्या सौ. प्रियंका ऋषिकेश थोरात यांचा शाल श्रीफळ, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला व श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर यांनी आभार मानून अध्यक्षीय परवानगीने कार्यक्रम संपल्याचे सांगितले.


