
केज/प्रतिनिधी
दि.१३ मे रोजी केज मतदार संघाचे युवा नेते अक्षय भैया नंदकिशोर मुंदडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अक्षय भैया मित्र मंडळच्या वतीने आयोजित भव्य आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे बुधवारी पंचायत समितीच्या मैदानावर उत्साहात उद्घाटन झाले. क्रीडाप्रेमींची मोठी उपस्थिती आणि मान्यवरांच्या मांदियाळीत या स्पर्धेचा बिगुल वाजला आहे.
दिग्गजांच्या हस्ते झाले.स्पर्धेचे उद्घाटन रणजितसिंह पाटील, डॉ. दत्तात्रय केंद्रे,नेताजी शिंदे,वसंत भाऊ केदार, डॉ.वासुदेव नेहरकर, भगवान केदार,महादेव अण्णा सूर्यवंशी,डॉ. दिनकर राऊत आणि विनोद गुंड या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी अक्षय भैयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खेळाडूंना खिलाडूवृत्तीने खेळण्याचे आवाहन केले.
बक्षिसांची लयलूट
या स्पर्धेत विजेत्या संघांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.प्रथम बक्षीस- शानदार रायडर (Two Wheeler),द्वितीय बक्षीस ५१ हजार रुपये रोख इतर अनेक वैयक्तिक आणि सांघिक आकर्षक बक्षिसे.
आयोजक व संयोजकांची मोठी फळी
स्पर्धेचे नियोजन यशस्वी करण्यासाठी मुख्य आयोजक सुनील घोळवे, खद्दीर कुरेशी,शिवाजी पाटील,राहुल भैयागदळे, शरद भैया इंगळे,सुरेश नांदे सर,अनिरुद्ध शिंदे आणि विष्णू थोरात यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.तसेच संयोजक म्हणून प्रकाश मुंडे, किरण सारूक सर, झहीरुद्दीन हाफी साहेब इनामदार आणि प्रमोद भैया मस्के हे स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कार्यरत आहेत.उद्घाटन सामना मुंडेवाडी विरुद्ध मांगवडगाव या दोन संघात खेळण्यात आला. तो सामना मुंडेवाडीने जिंकला.
क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उद्घाटन प्रसंगी केज शहरातील नागरिक, तरुण आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.पंचायत समितीचे मैदान प्रेक्षकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. अक्षय भैयांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित या क्रीडा सोहळ्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काही दिवस केजमध्ये क्रिकेटचा मोठा थरार पाहायला मिळणार आहे.



