प्रशासकीयसामाजिक

केज शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण आज हटविण्यात येणार

केज/प्रतिनिधी

दि.२२एप्रिल २०२६ रोजी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत व केज, अंबाजोगाई येथील सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवीण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.त्या प्रमाणे शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या अतिक्रमण धारकांना मुंबई महामार्ग १९५५ च्या कलम २३ प्रमाणे अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती.

परंतु यादरम्यान कोणीही अतिक्रमण हटविले नाही त्यामुळे शासकीय जागे वरील अतिक्रमण हटविण्याताना शांतता व सुव्यवस्था राखली जावी छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा चे कार्यकारी अभियंता यांनी बीड येथील पोलीस अधीक्षक यांच्याकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती.

त्या प्रमाणे विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त दिलेला आहे. त्यामुळे बुधवार,गुरुवार, आणि शुक्रवार या तीन दिवस केज येथील शासकीय जागेवरील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने ५० फुटा वर असलेले शासकीय जागेतील जे अतिक्रमण असेल ते उठवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अशोक भंडारे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!