केज बस स्थानकातून २० हजाराचे दागिने लंपास,केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील नातेवाईकाचे लग्न पुणे येथे असल्यामुळे शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान रूक्मीनबाई बाबुराव बारहाते रा.लोणगाव तालुका माजलगाव या केज बस स्थानकावर बसमधून उतरल्या होत्या व केज बस स्थानकात त्यांना घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची त्या वाट बघत बसल्या असतानाच,त्यांच्या पिशवीत ठेवलेले ८ ग्रॅम सोन्याचे मनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी मंगळवार दि.१२ मे रोजी दुपारी केज पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील रुक्मिणी बाबुराव बारहाते या त्यांच्या बोबडेवाडी येथील नातेवाईकाचे रविवार दि.१० मे रोजी पुणे येथे शुभविवाह असल्यामुळे त्या शनिवारी बोबडेवाडी येथील पाहुण्याकडे जाणार होत्या.
शनिवार दि.९ मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान त्या केज बस स्थानकावर आल्या होत्या व त्या ठिकाणी त्यांना घेऊन जायला येणाऱ्या पाहुण्यांची त्या वाट बघत असतानाच त्यांच्याजवळ दोन-तीन अज्ञात महिला आल्या व त्यांनी त्यांना असे सांगितले की,आत्ताच या ठिकाणी बस स्थानका तून काही महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिण्याची चोरी झाली आहे.
तुम्ही तुमच्या गळ्यातील दागिने काढून पिशवीत ठेवा.असे म्हणताच भोळ्या भाबड्या महिलेने आपल्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र काढून पिशवीत ठेवले. आणि याच्यावर पाळत ठेवून २० हजार ८०० रुपयाचे दागिने अज्ञात महिलांनी लांबविले.ही घटना समजल्यानंतर रुक्मिणी बाराहते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक फौजदार राजू वाघमारे ही पुढील तपास करीत आहेत.



