केज पोलिस ठाण्यात विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी विनयभंग व अॕट्रॉसीटीचाही गुन्हा नोंद

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील एका खेडेगावातील आंतरजातीय विवाह केलेल्या एका आदिवासी विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी ढाकेफळ येथील बाळू उर्फ श्रीराम थोरात याच्या विरुद्ध केज पोलिसात विनयभंग व अॕट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना रवीवार दि.११ मे रोजी सकाळी पिसेगाव फाटा परिसरात घडली.
केज तालुक्यातील एका खेडेगावातील आदिवासी समाजातील एका तरुणी ने सहा वर्षांपूर्वी केज तालुक्यातीलच एका खेडेगावातील तरुणा सोबत आंतरजातीय विवाह केला असून ते दोघेही सध्या परगावी एकत्र राहत आहेत. रविवार दि.११मे रोजी हे दाम्पत्य आपल्या खेडेगावातून केज येथे कपडे खरेदीसाठी दुचाकीवरून जात असताना विवाहितेच्या पतीच्या ओळखीच्या मित्राने पिसेगाव फाट्या जवळील मानवलोक कार्यालयासमोर हात दाखवून त्यांना थांबविले.
पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये आसलेल्या बाळू उर्फ श्रीराम थोरात यांनी कार थांबवून संबंधित महिलेबाबत जातीवाचक आणि लज्जा वाटेल असे अश्लील वक्तव्य करून तिच्या पतीशी वाद घातला.यावेळी महिलेच्या पतीने विरोध दर्शविल्यानंतर आरोपीने संबंधित महिलेकडे शरीरसुखाची मागणीही केल्याचा आरोप फिर्यादी मध्ये करण्यात आला आहे.या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात बाळू उर्फ श्रीराम थोरात याच्याविरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास केज पोलिस करीत आहेत.



