सामाजिक

अवैध वृक्ष तोडीला अधिकाऱ्याचे अभय, सामाजिक कार्यकर्ते सचिन उजगरे यांचा आरोप 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील युसूफवडगांव व परिसरात गेल्या काही दिवसांपासुन अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असुन याकडे धारूर वनपरिक्षेत्राचे अधिकारी ईश्वर गुनावत यांचे दुर्लक्ष होत असून,त्यांच्याकडून आरोपीला अभय मिळत असल्याची चर्चा आहे.

शुक्रवार दि.८ मे रोजी रात्री साडे सात वाजण्याच्या दरम्यान युसूफवडगांव परिसरातून शेवरी जातीच्या वृक्षाची तोड करून ते ट्रकमध्ये भरून जाणारी मालट्रक क्र.एम एच १२ एन एक्स २४८३ ही गाडी युसूफ वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन उजगरे यांनी धनेगाव फाट्यावरील वजन काट्यावर आली आसता पकडून धारूर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी ईश्वर गुनावत यांना कारवाई करून गाडी ताब्यात घेण्यासाठी यांना वारंवार फोन करूनही ते आले नाहीत.

त्यामूळे अवैध व विना परवाना लाकूड तोड करणाऱ्यांना त्यांचे अभय असल्याचे चर्चा परिसरात सुरु आहे. युसूफवडगांव पोलीस स्टेशनला पण वारंवार फोन करून ही माहिती दिली असता कोणीही आले नाही.ही लाकूड तोड आमच्या क्षेत्रात येत नसल्याचे कारण देत त्यांनी पण कारवाईस टाळाटाळ केली आहे. प्रशासनाने अशा कामचुकार व लाकुड चोरांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन उजगरे यांनी केली आहे.तसेच युसूफवडगाव परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!