
केज/प्रतिनिधी
केज येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व परिचित नाव डॉ.सौ. प्रतिभाताई अशोकराव थोरात यांनी नुकताच शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी माजी उप सभापती सौ.सरोजनीताई दादासाहेब ससाणे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पक्ष संघटना अधिक मजबूत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी बोलताना सौ.सरोजनी ताई ससाणे म्हणाल्या की,डॉ.सौ.प्रतिभाताई यांच्यासारख्या सुशिक्षित आणि जनसंपर्क असलेल्या महिला नेतृत्वा मुळे केज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद निश्चितपणे वाढणार आहे.सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या भविष्यातही आक्रमक पणे काम करतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.या सत्कार सोहळ्याप्रसंगी सौ.सरोजनीताई ससाणे, दादासाहेब ससाणे केज विधानसभा प्रमुख,तथा माजी संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती केज यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते आणि महिला आघाडी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जनसेवेचा संकल्प करत
सत्काराला उत्तर देताना डॉ.सौ.प्रतिभाताई थोरात यांनी पक्षप्रमुख आणि स्थानिक नेतृत्वाचे आभार मानले. शिवसेनेच्या माध्यमातून तळागाळा तील लोकांपर्यंत पोहोचून शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत मिळवून देणे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.



