स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी योगेश्वरी रोकडे हिचे दहावीच्या परीक्षेत देदिप्यमान यश,९७.४० टक्के गुण मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा ; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकशिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकाला नुसार,अंबाजोगाई येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी कु.योगेश्वरी संतोष रोकडे हिने घवघवीत यश संपादन केले आहे. योगेश्वरीने परीक्षेत ९७.४० टक्के गुण मिळवून शाळेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.योगेश्वरीने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे तिच्यावर आणि विद्यालयावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.अत्यंत चिकाटीने आणि नियोजित अभ्यासाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले असून, तिच्या या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शिक्षक आणि पालकांकडून कौतुक
योगेश्वरीच्या या यशा बद्दल तिचे शिक्षक, पालक,नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून तिचे अभिनंदन केले जात आहे.शाळेच्या शैक्षणिक परंपरेत योगेश्वरीने मिळवलेले हे गुण अत्यंत प्रेरणादायी असल्याचे शिक्षकांनी नमूद केले.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत कु. योगेश्वरी रोकडे हिने मिळवलेल्या या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.तिच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले असून,तिच्या भावी शैक्षणिक वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्या साठी शुभेच्छा दिल्या आहेत.


