सामाजिक

प्रेमाचा नवा त्रिकोण अनोखी प्रेम कहाणी, चार मुलांची आई, अन दोन मुलांचा बाप पळून जातात तेंव्हा,प्रेम आंधळे असते, अनोख्या लव्ह स्टोरीची तालुक्यात चर्चा 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खेडेगावातील चार मुलांची आई असलेली विवाहिता ही तिच्या तीन मुलांना घरी सोडून,एका लहान मुलाला सोबत घेऊन तिच्या घरा शेजारीच राहत असलेल्या दोन मुलांचा बाप असलेल्या तरुणा सोबत पळून गेली असून, या अनोख्या प्रेम प्रकरणाची केज तालुक्यात चर्चा सुरु आहे.दोन्ही कुटुंबाकडून परस्पर विरोधी तक्रारी युसूफवडगाव पोलिसात दाखल झाल्या आहेत.

केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खेडे गावातील २६ वर्ष वयाची ४ मुलांची आई असलेली विवाहित तरुणी तिच्या तीन मुलांना घरी सोडून व एका लहान मुलाला सोबत घेऊन घरा शेजारीच राहतअसलेल्या व भावकीतील एका २७ वर्षीय तरुण प्रियकरा सोबत पळून गेली आहे.

पळून गेलेला प्रियकर हा सुद्धा विवाहित असून त्याला पण दोन मुले असून तो दोन मुलांचा बाप आहे.मात्र या प्रेमी युगलांनी आपापल्या मुला बाळांचा आणि कुटुंबाचा विचार न करता पळून गेले आहेत.या प्रकरणी दोघांच्याही कुटुंबातील नातेवाईकांनी ते दोघे बेपत्ताअसल्याच्या स्वतंत्र तक्रारी युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात दाखल केल्या आहेत. मात्र या चार मुलांची आई ही दोन मुलांचा बाप असलेल्या प्रियकरा सोबत पळून गेल्याची चर्चा परिसरात चांगली रंगली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे या प्रेमी युगालाचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!