गुन्हेगारी

अंगणवाडी मदतनीस वर एक वर्षांपासून अत्याचार युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील एका खेडेगावातील ३० वर्षीय अंगणवाडी मदतनीस हिला लस्सीतून गुंगीचे औषध देऊन ती बेशुद्ध झाल्यानंतर तीचे फोटो, आणि व्हीडिओ काढले. व हे फोटो आणि व्हीडिओ समाज माध्यमा वर व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन एक वर्षांपासून कळंब,केज येथील विविध लॉजवर व पीडितेच्या गावी बळजबरीने एक वर्षांपासून बलात्कार केल्याच्या पीडितेने दिलेल्या फिर्यादी वरून विकास लक्ष्मण खाडे रा. संभाजीनगर,कळंब याच्या विरुद्ध युसूफ वडगाव पोलिसात गून्हा नोंद झाला असून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.

केज तालुक्यातील एका खेडेगावात अंगणवाडी मदतनीस म्हणुन कार्यरत असलेल्या ३० वर्षीय महिलेची कळंब येथील संभाजीनगर येथे राहणाऱ्या विकास लक्ष्मण खाडे याच्याशी ओळख झाली.त्यातून जवळीकता वाढत गेल्या मुळे एक दिवशी आरोपीने पिडीत महिलेला लस्सी मधून गुंगीचे औषध देऊन ती बेशुद्ध झाल्यानंतर तीचे नको त्या अवस्थेतील फोटो आणि व्हीडिओ काढले.व तिच्यावर कळंब येथील बालाजी लॉज,प्रेरणा लॉज,केज येथील सागर /प्रताप लॉज,आणि पीडितेच्या गावी मे २०२५ ते २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९-३० वाजण्याच्या दरम्यान या कालावधीत फोटो व व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी व जीवेमारण्याची धमकी देऊन वारंवार बळजबरीने अत्याचार व बलात्कार केल्याची फिर्याद पिडीत महिलेने दिल्या वरून विकास लक्ष्मण खाडे रा. संभाजीनगर,कळंब याच्या विरुद्ध युसूफ वडगाव पोलिसात गून्हा नोंद झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांनी पीडितेच्या गावी जाऊन चौकशी केली.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!