क्रिडासामाजिक

भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘ पुणे येथील जीएसटी संघाने मारली बाजी ; अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त केजमध्ये खेळाचा थरार!

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र दिन आणि युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केज येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा समारोप अत्यंत उत्साहात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संघांनी आपल्या अष्टपैलू खेळाने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.अंतिम सामन्यात पुणे येथील जीएसटी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

मैदानावरील चुरस आणि निकाल स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे राहिला. प्रथम पारितोषिक विजेता पुणे जीएसटी टीम,द्वितीय पारितोषिक अमन संघ,बीड,तृतीय पारितोषिक अमन बी संघ,बीड,चतुर्थ पारितोषिक किनवट संघ नांदेड,

वैयक्तिक कामगिरीचा गौरव

केवळ सांघिकच नव्हे, तर वैयक्तिक कौशल्यात ही खेळाडूंनी चमक दाखवली.स्पर्धेतील मानकरी ठरलेले खेळाडू मॅन ऑफ द मॅच- हर्ष चौधरी,बेस्ट स्मॅशर- वाजिद सय्यद,बेस्ट सर्व्हिस- शोएब सय्यद, बेस्ट लिब्रो- पांड्या

मान्यवरांच्या उपस्थितीत 

बक्षीस वितरण संपन्न झाले.समारंभाला रणजीत सिंह पाटील, पीएसआय फारुख कादरी,कबीर इनामदार, अकबर इनामदार, प्रकाश मुंडे पत्रकार, विनोद गुंड सर,रमजान भाई,एत्तेशाम कादरी आणि वसीम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिशान कादरी आणि खद्दीर कुरेशी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व खेळाडू,पंच,मान्यवर आणि क्रीडाप्रेमींचे आभार मानले.या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक मंडळाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!