केज तालुक्यातील सुर्डी पाटी येथे काठीने मारहाण करून टिप्पर चालकाचा खुन,आरोपी जेरबंद

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात सुर्डी येथे काठीने मारुन एका टिप्पर चालकाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,खुशालराम बलभीम ठोंबरे वय ५५ वर्ष रा. सुर्डी ता.केज असे मयताचे नाव असून, खुशालराम ठोंबरे आणि ग्रामपंचायत कर्मचारी आरोपी मंगेश भरत माने या दोघांचे घरगुती कारणावरुन सोमवारी वाद झाला होता.
मंगळवार दि.५ मे रोजी खुशालराम ठोंबरे हे सुर्डी फाटा येथे एका हॉटेल मध्ये बसलेले असताना त्यांना आरोपी मंगेश माने आणि आणखी एकाने असे दोघांनी मिळून सोमवारी झालेल्या वादाच्या कारणावरून काठीने बेदम मारहाण केली.या मारहाणीत खुशालराम ठोंबरे हे गंभीर जखमी झाले होते.त्यांना तातडीने कळंब येथे उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.मात्र दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच याप्रकरणी आरोपी मंगेश भरत माने यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.मयत टिप्पर चालक खुशालराम बलभीम ठोंबरे यांचा मुलगा बालाजी खुशालराम ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून मंगेश भरत माने याच्या विरुद्ध दि.५ मे रोजी रात्री ८-३० वाजण्याच्या सुमारास गु. र.नं.१२४/२०२६भा.न्या. सं.१०३(१) नुसार युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी भरत माने याला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी मयत टिपर चालक खुशालराम बलभीम ठोंबरे यांच्यावर धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.या प्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे पुढील तपास करीत आहेत.



