

केज/प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे दि.१६ एप्रिल २०२६ ते २२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात येथील साने गुरुजी निवासी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.चौरे स्वाती श्रीकिसन हिला रजतपदक मिळाले आहे.या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाले.
रजतपदक प्राप्त विद्यार्थ्यांनी कु.चौरे स्वाती श्रीकिसन हिचा सत्कार बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे अध्यक्ष अँड.उद्धवराव कराड साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ. कविता गित्ते- कराड मॅडम,संस्थेचे उपाध्यक्ष राजेश कापसे सर,तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



