

केज/प्रतिनिधी
केज तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल पडले असून, लव्हरी रोड,कानडीमाळी येथे दिया क्रिकेट अकॅडमी व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियम चा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री. जतीन रहमान मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड,श्री. सुरजजी केंद्रे जिल्हा न्यायाधीश सोलापूर, सुनील लांजेवार अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि व्यंकट राम पोलीस उपअधीक्षक केज आदी दिग्गज प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अकॅडमीचे सचिव डॉ. दिनकर राऊत आणि अध्यक्ष श्री.डी.बी.माळी यांच्या अथक परिश्रमा तून हे स्टेडियम साकारले आहे.ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे हा या अकॅडमीचा मुख्य उद्देश आहे.यावेळी केज येथील ‘हास्य क्लब’च्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.
या सुसज्ज अकॅडमीमुळे केज तालुक्यातून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे क्रिकेटपटू घडतील,असा विश्वास जिल्हाधिकारी विवेक जाॕन्सन यांनी व्यक्त केला. यावेळी खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दिनकर राऊत यांनी केले तर सुत्र संचालन हनुमंत भोसले यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला.



