
केज/ प्रतिनिधी
आनंद वसुदेवराव गायकवाड यांनी २०२५ – २०२६ या वर्षासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापिठात स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई येथील अभ्यास केंद्रातून प्रकल्प अहवाल व शोधनिबंध सादर केला आहे.
आनंदगांव येथील स्वानंद सार्वजनिक वाचनालया चा शासकिय अनुदानातून आणि वाचक वर्गणीतून झालेला विकास : एक अभ्यास या विषयावर ११७ पानी प्रकल्प सादर अहवाल केला.यात प्रामुख्याने २०१५-१६ ते २०२४ -२५ चा १० वर्षाचा आढावा घेतलेला आहे.यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. भाऊराव मुंडे हे लाभले. त्यांच्याच मार्गदर्शनात आनंद भैय्या वसुदेवराव गायकवाड यांनी अतिशय अभ्यासू असा ११७ पानी प्रकल्प यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांना सादर केला.केंद्र संयोजक प्रा. डॉ.पी.सी.गारेकर यांनी ही यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच बहिस्थ परिक्षक म्हणून प्रा.मिश्रा,प्रा.डॉ.मधुबाला तसचे प्रा.डॉ.काकडे यांचेही मागदर्शन लाभले.
तसेच स्वानंद सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी १० वर्षाची माहिती ग्रंथालयाची माहिती देवून मार्गदर्शनही केले. तसेच स्वानंदसार्वजनिक वाचनालयातील ३५५ वाचकां पैकी १०० वाचकांच्या प्रश्नावली प्रत्यक्ष वाचनालयात बाल वाचक,महिला वाचक, प्रौढ वाचक यांच्याकडून प्रत्यक्ष भरून घेवून हा प्रकल्प अहवाल पूर्ण करता आला.१०० वाचक सभासदांनी प्रत्यक्ष प्रश्नावली भरून देवून मदत केली.त्यांचेही आभार आनंद भैय्या गायकवाड यांनी मानले आहेत.ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री)याकामी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
ज्ञानाधिष्ठीत समाजासाठी ग्रंथालय शास्त्राच्या पाच सिद्धांताची उपयुक्तता या विषयावर १२ पानी अभासू असा शोधनिबंध यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांना याच मास्टर डिग्रीसाठी पदव्युत्तर पदवी साठी सादर केला.यासाठीही वरील सर्व तज्ञ प्रा.डॉ.व स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज. जि.बीड चे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत व जेष्ठ समाज सेवक डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.प्रकल्प व शोध निबंधाचे अभ्यासक आनंद वसुदेव राव गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.



