शैक्षणिकसामाजिक

सूर्यकांत काळे यांच्या सारख्या शिक्षकांची समाजाला गरज – खा. बजरंग सोनवणे यांचे प्रतिपादन केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सेवागौरव सोहळा थाटात संपन्न,शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

केज/प्रतिनिधी

केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांनी माळेगावच्या शाळेला पीएमश्री योजनेत स्थान मिळवून देऊन ग्राम विकासात मोठे योगदान दिले.त्यांच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ शिक्षकांची जिल्हा परिषद शाळांना गरज आहे,असे प्रतिपादन खासदार बजरंग सोनवणे यांनी केले.प्राथमिक शिक्षण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा साळेगाव जिल्हा परिषद प्रशाले तील केंद्रीयमुख्याध्यापक सूर्यकांत तुकाराम काळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त माळेगावात गौरवसोहळा झाला.बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते सूर्यकांत व सुरेखा काळे यांचा भव्य पुष्पहार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

डॉ.संजय शिंदे यांनी सन्मानपत्राचे लेखन तर अरुण शिंदे यांनी वाचन केले. कार्यक्रमास माजी आ.पृथ्वीराज साठे, माजी आ.संगीता ठोबरे, माजी पं.स.सभापती राजेसाहेब देशमुख, अनुराधा नखाते, नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड, हारुणभाई इनामदार, नबाब मामु,डॉ.देवेंद्र डोके,बालासाहेब जाधव, बाळकृष्ण भवर,सरपंच कैलास पाटील,माजी मुख्याध्यापक पी.के. देशमुख,’छावा’चे जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे आदीची प्रमुख उपस्थिती होती.सूर्यकांत काळे यांनी गेल्या साडेतीन दशकात जिल्हा परिषद शाळेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा गौरव सोहळा होत असल्याचे प्रास्ताविकात मुख्याध्यापक अर्जुन बोराडे म्हणाले.तर हाच धागा पुढे पकडून खासदार बजरंग सोनवणे म्हणाले,सूर्यकांत काळे यांना गेल्या चार दशकां पासून आपण ओळखत असून ग्रामीण विद्यार्थ्यां साठी त्यांची तळमळ जवळून पाहिली आहे. त्यांच्यासारख्या हरहुन्नरी, धडपड्या व कर्तव्यनिष्ठ शिक्षकांची समाजाला गरज आहे.

शाळेसोबतच केज तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे त्यांनी उत्तम काम केल्याचा गौरवही त्यांनी केला.तर साळेगाव शाळा केज तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आदर्श बनविण्यात श्री.काळे यांचे योगदान असल्याचे गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे म्हणाले.सर्व शाळेतील सर्व सहकारी व गावकऱ्यांच्या मदतीने शाळेचा चेहरा मोहरा बदलण्यात आपण यशस्वी ठरलो असे मुख्याध्यापक सुर्यकांत काळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की.चारे या खेड्यातून अत्यंत कष्ट व जिद्धीमुळेच आपण इथपर्यंत पोहोचल्याचे ते म्हणाले.गोविंद मुळे यांनी सूत्रसंचालन तर अरुण पवार यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक पी. के.देशमुख,श्री.चवरे, अक्षय व राजेश काळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षण, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बजरंग सोनवणे यांच्या हस्ते मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी राजेसाहेब पापा देशमुख,पृथ्वीराज साठे, सुनील केंद्रे,अंकुशराव इंगळे,शिवाजी ठोंबरे यांची व्यासपीठावर उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!