शैक्षणिक

केज येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न 

केज/प्रतिनिधी

स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेतील ७ विद्यार्थ्यांची राजर्षी शाहू महाविद्यालय व संत तुकाराम महाविद्यालय लातूर येथे स्क्रीनिंग टेस्ट द्वारे निवड विद्यार्थ्यांचा शुक्रवार रोजी सत्कार करण्यात आला.या

कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.बी.गदळे सर होते तर प्रमुखपाहुणे डॉ.हनुमंत सौदागर,संस्थेचेउपाध्यक्ष नईमोद्दीन इनामदार, मुख्याध्यापक वसंत शितोळे आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना डॉ.सौदागर म्हणाले की,अभ्यासाने सर्व काही शक्य होते. ध्येयपूर्तीसाठी सातत्य पूर्वक प्रयत्न केल्यास यश निश्चित प्राप्त होते असे मत व्यक्त केले.

राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर स्क्रीनिंग टेस्टमध्ये- श्रावण रामदास चाटे, आकांक्षा दीपक सांजुरे, प्रज्ञा दिनकर घुले, श्रेयश रघुनाथ बनसोडे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.तर संत तुकाराम महाविद्यालय लातूर स्क्रीनिंग टेस्टमध्ये- सई बालाजी साखरे,ज्ञानदा सुनील गायकवाड,आयुष जयप्रकाश सातपुते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास सहशिक्षक श्री.मंगरुळकर,श्री.चौरे सर,श्री.भालेकर सर, श्रीमती लोंढे मँडम, श्रीमती केंद्रे मँडम यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती देशपांडे मँडम यांनी केले तर आभार श्री.चोले सर यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!