गुन्हेगारी

जुन्या वादातून आनेगाव येथे दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी

जुन्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन एका दाम्पत्याला लाठ्या काठ्या,केबलची वायर आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील आनेगाव शिवारात घडली आहे.याप्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात सहा जणां विरुद्ध विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार,फिर्यादी विजयकुमार उत्तमराव कुलकर्णी वय ५९,रा. आनेगाव हे दि.३ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शेतात पाणी देण्यासाठी आपल्या दुचाकीवरून जात होते.यावेळी पांढरी नावाच्या शिवारात आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली.”तुम्ही आमच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला का गेलात?” असा जाब विचारत आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

दगड आणि केबलने मारहाण

हा वाद विकोपाला गेल्यावर आरोपींनी विजयकुमार कुलकर्णी आणि त्यांची पत्नी सीमा यांना लाथाबुक्क्यांनी, हातातील केबलच्या वायरने आणि दगडाने मारहाण केली.यामध्ये कुलकर्णी यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखमा झाल्या आहेत, तर त्यांच्या पत्नीलाही जखमी करण्यात आले. मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. जखमींवर सध्या अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सहा जणांवर गुन्हा

याप्रकरणी विजयकुमार कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तुकाराम त्रिंबक कोल्हे, कृष्णा तुकाराम कोल्हे दोघे रा.नायगाव,विक्रम परसराम हंडीबाग,वंदना विक्रम हंडीबाग,शोभा विठ्ठल हंडीबाग,रतन परसराम हंडीबाग सर्व रा.आनेगाव यांच्यावर युसूफवडगाव पोलिसांनी या घटनेची नोंद भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११८(१), ११५(२),१२६(२), ३५२,३५१(२), १८९(२), १८९(४),१९० आणि १९१(२) नुसार फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सीताराम डोंगरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!