सामाजिक

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध –खा.रजनीताई पाटील आनेगाव शिवारात सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ

केज/प्रतिनिधी

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे.शाश्वत विकासासाठी असे प्रकल्प उभारले पाहिजेत असे मत खा.रजनीताई पाटील यांनी केले त्या आनेगाव शिवारातील  केज सोलार प्रायव्हेट लिमिटेड २ मॅगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

प्रमुख उपस्थिती माजी मंत्री अशोकराव पाटील, माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील,गंगा माऊली साखर कारखान्याचे चेअरमन हनुमंत मोरे, पाटील,युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे,युसुफ वडगाव महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री हलकुडे,गंगा माऊली उद्योग समूहाचे प्रवीण मोरे,काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे,आदित्य ग्रीन एनर्जी लातूरचे जितेंद्र बजाज,अँड.अमित पाटील, तेजस्विनी पाटील,देविका पाटील, रेवती सोनवणे आदींच्या हस्ते प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मांजरा प्रकल्प शाखाधिकारी ए.बी.गिरी बी.एस.ठोंबरे, आनेगावचे चेअरमन रवी इंगळे, शंकरराव इंगळे,माळेगाव चे सरपंच कैलास गव्हाणे बाळासाहेब नांदे, अंगदराव हंडीबाग, बालाजी इंगळे,भारत इंगळे,अंकुश हांडीबाग, शिवाजी इंगळे,श्रीराम इंगळे,अंकुश इंगळे, श्रीराम नांदे,गोविंद दोडके,अरविंद मोरे, जयसिंग राऊत, ज्योतीराम सावंत, शिवरुद्र चोपणे,दत्ता निकम,पिंटू कोरसाळे, राम इखे,ज्ञानोबा देवकर, नागनाथ कोरसाळे, नरसिंग सोनवणे,उप सरपंच रवी सोनवणे, प्रशांत आदनाक, आबासाहेब शिंदे,यावेळी बोलताना अशोकराव पाटील म्हणाले की, सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास शेतकरी समृद्ध होईल असे मत व्यक्त केले.

आनेगाव गावकऱ्यांच्या वतीने शिवारात प्रकल्प उभा केल्यामुळे खा.रजनीताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना राहुल सोनवणे म्हणाले की,खा. रजनीताई पाटील यांचा या भागाशी ऋणानुबंध आहे.या भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दिवसभर विद्युत पुरवठा होणार असल्याने त्यांच्या जीवनात समृद्धी येईल असे मत व्यक्त केले.कार्यक्रमास परिसरातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी केज सोलार प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापन यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!