गुन्हेगारी

युसुफवडगाव येथे रात्री तून महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभारला,अज्ञातांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील युसुफवडगाव येथे ग्रामपंचायत कार्यालया समोर रात्रीतून अज्ञात कार्यकर्त्यांनी महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळ्याची उभारणी केल्या प्रकरणी ग्राम पंचायत अधिकारी प्रदीप नखाते यांच्या फिर्यादी वरून अज्ञात इसमां विरुद्ध युसूफवडगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

युसुफवडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर अज्ञात लोकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या पाच ते सहा फुट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी केल्याचे निदर्शनास आले. पुतळा उभारण्यापूर्वी यालोकांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची परवानगी न घेता हा पुतळा त्यांच्या मालकीच्या जागेत उभारल्याचे स्पष्ट झाले.

गावातील सरपंच,ग्राम पंचायतचे सदस्य यांच्या कडे विचारणा केली असता त्यांनी कोणी पुतळा उभा केला,याची माहिती नसल्याचे सांगितले.तर पुतळ्याचे पावित्र्य न राखता व सुरक्षेची काळजी न घेता पुतळाउभारणी केल्याची फिर्याद सोमवार दि.३१ मार्च रोजी ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप नखाते यांनी दिल्यावरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध युसूफ वडगांव पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शना खाली जमादार सीताराम डोंगरे हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!